
दुबई : चित्रपटसृष्टीच्या जगात अमेरिकेचे हॉलिवूड आहे तसे भारताचे बॉलिवूड सुध्दा प्रसिध्द आहे.मुंबईचे बॉलिवूड,हिंदी सिनेसृष्टी या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत.दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दुबई येथे केले.दुबई येथील हॉटेल लॅव्हेंडर मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्डचे वितरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना करण्यात आले.यावेळी दादासाहेब फाळके अवॉर्ड ने ना.रामदास आठवले यांचा ही भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी दादासाहेब फाळके अवॉर्ड चे आयोजक कल्याणजी जाना उपस्थित होते.यावेळी भाजपचे महामंत्री दुष्यंत गौतम,याकुब अली तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत उपस्थित होते.
दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला.त्यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी मुकपट निर्माण केला.हा सिनेमा भारतातील पहिला सिनेमा ठरला.त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी 95 चित्रपट आणि 26 लघुपट निर्माण केले.भारतीय चित्रपट सृष्टीत दिलेल्या या भरीव योगदानामुळे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक ठरले आहेत.त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
दादासाहेब फाळके अवॉर्ड चे संयोजक कल्याणजी जाना हे अत्यंत गरिबीतून पुढे आलेले समाजसेवक आहेत.त्यांनी दुबई सारख्या व्यापार आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र ठरलेल्या शहरात हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्या बद्दल ना . रामदास आठवले यांनी कल्याणजी जाना यांचे कौतुक केले.