
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हा केवळ माध्यमांमध्ये सरकारने तयार केलेला तमाशा आहे, असे वादग्रस्त विधान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवार, २९ जुलै रोजी लोकसभेत केले. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना त्यांनी सभागृहात हे भाष्य केले. यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना देशभक्तीचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात हे केवळ माध्यमांमध्ये सरकारने तयार केलेला तमाशा आहे. या मोहिमेमधून काय साध्य झाले, याची माहिती कुणीही देत नाही. यात किती दहशतवादी पकडले गेले? भारताची किती लढाऊ विमाने नुकसानग्रस्त झाली? यासाठी कोण जबाबदार आहे? आणि चूक कुणाची आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे जबाबदारी सरकारची आहे," असे त्या म्हणाल्या.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांचा बळी गेला. या हल्ल्याला उत्तर म्हणून भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळं उध्वस्त केली. मात्र, आता प्रणिती शिंदेंच्या या वादग्रस्त विधानाने त्यांच्यावर टीकेच झोड उठली आहे.