धाराशिवमध्ये भयंकर प्रकार! पोटच्या अर्भकाचा दहा हजारांसाठी केला सौदा!

29 Jul 2025 14:13:04
 
horrible-incident-in-dharashiv-a-baby-in-the-womb-was-traded-for-ten-thousand
 
धाराशिव:  जिल्ह्यातील मुरूम येथील बाळाचा जन्मदात्या आईने दहा हजारात सौदा केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आई असूच शकत नाही...ही तर सौदागर अश्या तीव्र भावना मुरूमच्या स्थानिकांनी दिसून आल्या. बाळावर बेकायदेशीरीत्या दत्तक प्रक्रिया करत सौदागर आईने आपल्या बाळाचा सौदा केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, बाळाच्या आजीने या गैर प्रकारावर आवाज उठवत हा प्रकार उघडकीस आणला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या गरजेतून बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने आईने पोटच्या बाळाची दत्तक प्रक्रिया ही दत्तक प्रक्रियेसाठी बेकायदेशीर असलेल्या १०० रूपये बॉण्ड पेपरवर बनवत १० हजारात बाळाचा सौदा केल्याची संतापजनक घटना धाराशिवच्या मुरूम येथे घडली आहे. दरम्यान, मुरूम पोलीस ठाण्यात आता या प्रकरणी सौदागर आईसह सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बालकल्याण समितीने सौदा करण्यात आलेल्या बाळाला शिशुगृहाच्या निगराणीत ठेवले असून, धाराशिव शासकीय रुग्णालयातील एनआयसीयू विभागात (नवजात अतिदक्षता विभाग) बाळावर उपचार सुरू आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0