मुंबई, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांचे चुलत बंधू ब्रिजमोहन कौल यांची आसाममध्ये मोठ्या लष्करी पदावर नियुक्ती केल्याचा खळबळजनक दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काल ऑपरेशन सिंदूरफ वरील चर्चेत लोकसभेत बोलताना केला.
ऑपरेशन सिंदूरफवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वादळी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरफवरुन सरकारवर टीका करण्यात आली. या चर्चेदरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक खळबळजनक दावा केला की, नेहरू यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान ब्रिजमोहन कौल या त्यांच्या चुलत भावाला आसाममध्ये बढती देण्यासाठी, १८ अन्य सैन्य अधिकार्यांची वरिष्ठता डावलण्यात आली होती.
लष्करी अधिकारी असलेल्या ब्रिजमोहन कौल यांची १९६२च्या भारत-चीन युद्धातील कामगिरीही वादग्रस्त ठरली होती. कौल यांच्या युद्धातील भूमिकेवर आणि रणनीतीवरही नंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या विषयाशी संबंधित एका अहवालामध्ये, १९६२च्या युद्धादरम्यान कौल यांनी अनेकदा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना तब्येतीच्या तक्रारींची कारणे असलेले अनेक टेलिग्राम पाठवल्याचेही उल्लेख केले आहेत. तसेच, पंतप्रधान नेहरुंचा चुलत भाऊ असल्याने लष्करी कमांडला बाजूला ठेवून, राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी घेणे, त्यांच्याशी थेट चर्चा करणे हा त्यांचा शिरस्ता असल्याचेही सदर अहवालामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे कौल यांची रणनीती, युद्धाचे नियोजन यावरही टीका करण्यात आली आहे.
कौल यांच्या व्हीव्हीआयपी वागणुकीवरही प्रश्नचिन्हसैन्यात कौल यांना मिळणार्या विशेष वागणुकीवरही अहवालामध्ये प्रकाश टाकला आहे. कौल यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना सैन्य छावणीतून दिल्लीला हलवण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक आणि विमान आले होते. विशेष म्हणजे, या हालचालींबाबत सैन्याच्या कोणत्याही अधिकार्याला काहीही माहिती दिली नसल्याचे त्या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच, हे विमान तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णा मेमन यांनी पाठवल्याचेही त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.