नको तिथे तुष्टीकरणाचे राजकारण...! चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंना सल्ला

    29-Jul-2025
Total Views | 27


नवी दिल्ली : नको तिथे तुष्टीकरणाचे राजकारण करायला जाऊ नका, असा सल्ला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार प्रणिती शिंदेंना दिला आहे. प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर चित्रा वाघ यांनी हा पलटवार केला.

चित्रा वाघ म्हणाल्या की, "भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला ‘तमाशा’ म्हणताना प्रणिती शिंदेंना लाज वाटली नाही का? ज्यांच्या बळावर तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित आहोत, त्यांच्याबद्दलच अशी उपेक्षात्मक भाषा? नाही तिथे तुष्टीकरणाचे राजकारण करायला जाऊ नका. हा केवळ भारतीय सैनिकांचाच अपमान नाही तर प्रत्येक देशभक्त नागरिकेच्या अस्मितेवर घाव आहे. शौर्याला तमाशा म्हणणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही हे लक्षात ठेवा," असे त्या म्हणाल्या.


प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना सभागृहात बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना देशभक्तीचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात हे केवळ माध्यमांमध्ये सरकारने तयार केलेला तमाशा आहे. या मोहिमेमधून काय साध्य झाले, याची माहिती कुणीही देत नाही. यात किती दहशतवादी पकडले गेले? भारताची किती लढाऊ विमाने नुकसानग्रस्त झाली? यासाठी कोण जबाबदार आहे? आणि चूक कुणाची आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे जबाबदारी सरकारची आहे," असे त्या म्हणाल्या. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121