बंधन बँकेतर्फे पंढरपूरमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन; महाराष्ट्रातील नेटवर्क करणार अधिक मजबूत

· या नवीन शाखेसह आता बँकेची महाराष्ट्रात 350 हून अधिक बँकिंग आऊटलेट्स

    29-Jul-2025
Total Views | 6

bandhan-bank-inaugurates-new-branch-in-pandharpur
 
 
सोलापूर : बंधन बँकने आज महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आपल्या नवीन शाखेच्या उद्घाटनाची घोषणा केली. या शाखेचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे आणि बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पार्था प्रतिम सेनगुप्ता यांच्या उपस्थितीत केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. सचिन लंगुटे, उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांचा समावेश होता.
 
शाखा नेटवर्कचा विस्तार हा बंधन बँकच्या देशभरातील स्थान मजबूत करण्याच्या आणि विविधतेवर भर देण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा भाग आहे. पंढरपूरसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्री नवीन शाखा सुरू केल्यामुळे बँकेला स्थानिक रहिवासी, व्यावसायिक तसेच मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या विविध आर्थिक गरजांची अधिक चांगल्या प्रकारे पूर्तता करणे शक्य होईल. हा उपक्रम आधुनिक आणि ग्राहक-केंद्रित उपाय सुविधा पुरविण्याच्या बँकेच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत आहे. या उद्घाटनानंतर, बँकेची महाराष्ट्रात 350 हून अधिक आणि संपूर्ण भारतात 6,350 पेक्षा अधिक बँकिंग आऊटलेट्स झाली आहेत.
 
नवीन शाखेच्या उद्घाटनाबरोबरच, बंधन बँकेने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत या तीर्थक्षेत्री शाश्वत पायाभूत सुविधा उभारणी करायला पाठबळ म्हणून पंढरपूर मंदिर परिसरात सौरऊर्जेवर चालणारे स्ट्रीटलाइट्स बसवले. या उपक्रमाचा उद्देश सार्वजनिक सुरक्षेत वाढ करणे, शाश्वत ऊर्जा वापराला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक पायाभूत सुविधांना मदत करणे असा आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, बँकेने औपचारिकरित्या सौर स्ट्रीटलाइट्सचे गिफ्ट डीड नगरपालिकेकडे सुपूर्त केले. समाजाप्रती असलेली दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण बांधिलकी यातून अधोरेखित झाली.
 
या प्रसंगी बोलताना बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पार्था प्रतिम सेनगुप्ता म्हणाले, “पंढरपूर येथे आमच्या नवीन शाखेचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही शाखा आमच्या नेटवर्कला अधिक बळकट करत असून ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्यास मदत करेल. आमच्या भौगोलिक विस्ताराच्या धोरणाचा भाग म्हणून ही शाखा वंचित आणि उभरत्या बाजारपेठामध्ये पोहोचण्यास मदत करेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल. शिवाय, पंढरपूर मंदिर परिसरात सौरऊर्जेवर चालणारे स्ट्रीटलाइट्स बसवण्याच्या आमच्या सीएसआर उपक्रमातून आम्ही ज्या समाजाला सेवा पुरवितो त्यांच्यात सकारात्मक, दीर्घकालीन परिणाम घडवून आणण्याच्या आमचा उद्देश प्रतिबिंबित होतो. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक बँकिंग उपायसुविधा देत शाश्वत भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहोत.”
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची निर्घृण हत्या झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाली असून सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. झुंडमध्ये प्रियांशू उर्फ बाबूने लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांची निवड केली होती. त्यातीलच एक प्रियांशू होता. त्याने अमिताभ बच्चनसोबतही भूमिका साकारली होती. तो फूटबॉल पटू देखील होता पण कायमच तो गुन्हेगारीमुळे क्षेत्रात वावरत होता. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121