विशेष मुलांच्या विशेष यशासाठी!

29 Jul 2025 12:35:54

गतिमंद असलेल्या अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तन-मन अर्पून मेहनत घेणार्‍या डॉ. भगवान तलवारे यांच्याविषयी...

तो लहान मुलगा घरातला गोठा साफ करत होता, त्याच गोठ्यात एक विषारी साप आला. तो साप त्या मुलाला डसणार इतक्यातच, गतिमंद असलेला छोटू मध्ये पडला आणि सापाने छोटूलाच दंश केला. छोटूमुळे त्या मुलाचा जीव वाचला. या घटनेने त्या मुलाने निर्धार केला की, आपण गतिमंद, दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात मानवी आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट सामना नियोजन समिती’चे अध्यक्ष आहेत. ’भारतीय दिव्यांग क्रिकेट बोर्ड’ नवी दिआनंद, स्थिरता आणण्याचा प्रयत्न करायचा. आज तोच मुलगा म्हणजे, डॉ. भगवान निंबा तलवारे. ते ‘राष्ट्रीय व ल्लीचे सहअध्यक्ष आहेत; तर ‘दिव्यांग क्रिकेट बोर्ड असोसिएशन मुंबई’ व विदर्भाचेही अध्यक्ष आहेत. तसेच ते ‘स्पेशल ऑलिम्पिक भारत’चे विभागीय संचालक असून, ‘दिव्यांग संस्था चालक महासंघ’ या संस्थेचे राज्यपातळीवरचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.

संपर्कात येणार्‍या प्रत्येक दिव्यांग तसेच, गतिमंद व्यक्तींच्या कल्याणासाठी डॉ. भगवान न थकता, न थांबता सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यांचे हे काम अत्यंत संयमाचे आणि कष्टाची परीक्षा घेणारे आहे. पण, भगवान यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या वसतिगृहामध्ये गतिमंद अनाथ मुलेही आहेत. मुलांच्या सुख-दुःखाशी एकरूप होत, त्यांनी मुलांचे गुण हेरले. क्रीडा क्षेत्रात ही मुलं कशी प्रविण होतील, याबाबत कामही केले.

भगवान हे ‘कै बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था’ थाळनेरचे संस्थापक अध्यक्ष आहेत. धुळे येथील ‘अनाथ मतिमंद मुला-मुलींचे बालगृह’, ‘अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा’, ‘निवासी मतिमंद विद्यालय’, ‘निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा’, ‘निवासी मूकबधिर विद्यालय’ या शैक्षणिक संस्थांचे संस्थापक-अध्यक्ष असून, ठाणे, शहापूर येथील ‘निवासी मतिमंद मुलांच्या विद्यालया’चे संस्थापक-अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. गतिमंद मुलांच्या क्रीडा स्पर्धेत डॉ. भगवान यांच्या वसतिगृहातील मुलांनी, उज्ज्वल कामगिरी केली. वसतिगृहातील मुलांनी चार सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. समाजानेच काय, प्रत्यक्ष जन्मदात्या आईवडिलांनीही नाकारलेल्या मुलांच्या कर्तृत्वाला त्यामुळेच धुमारे फुटले. वेदना भोगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला नाही, तर अंगभूत गुणांच्या जोरावर यश संपादन करणे हेच तुमच्या जन्माचे लक्ष्य आहे, हेच डॉ. भगवान या मुलांना कृतीद्वारे सांगतात. डॉ. भगवान तलवारे यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.

धुळे जिल्ह्यातल्या धाडनेर गावचे मराठा समाजाचे तलवारे कुटुंब. निंबा आणि द्रौपदाबाईंना सहा अपत्ये, त्यांपैकी एक भगवान. निंबा हे शेतकरी होते पण, हाडाचे समाजसेवक. गोरगरिबांच्या हाकेला धावून जायचे. गरिबा घरच्या लेकीचे लग्न असेल, तर मंडप आणि इतर लग्नाच्या तयारीचा खर्च निंबाच द्यायचे. तसे तलवारेंचे कुटुंब संयुक्त कुटुंब. हे कुटुंब म्हणजे हसतं, खेळतं गोकुळच पण, यात एकच वेदना होती ती म्हणजे, भगवान यांचा छोटू नावाचा चुलत भाऊ गतिमंद होता. गोड आणि निरागस छोटू. घरातले म्हणत, “आपल्याकडे सगळं आहे; मात्र छोटूसाठी आपण काहीच करू शकत नाही.” त्यामुळे या संयुक्त कुटुंबाने ठरवले की, कुटुंबातल्या एका तरी मुलाने विशेष मुलांसाठीच्या शिक्षणासंदर्भात शिक्षण घ्यायचे. डॉ. भगवान यांनी यामध्ये पुढाकार घेतला. सगळे ठीक सुरु होते मात्र, अचानक काळाने घाला घातला. एकवर्ष असे आले की, शेतीतले उत्पन्न मातीमोल ठरले. याच काळात भगवान यांच्या वडिलांचेही निधन झाले. संयुक्त कुटुंबाचे विघटन झाले. परिस्थिती बिकट होती मात्र, भगवान यांनी याही परिस्थितीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

पुढे भिवंडी येथे ते कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत नोकरीसाठी रूजू झाले. इथेच त्यांना गतिमंद, दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यातल्या अनेक समस्या नव्याने समजल्या. आपण लहानपणी गतिमंद व्यक्तींसाठी काम करू असा निश्चय केला होता, आता ती वेळ आल्याचे त्यांच्या मनाने सांगितले. त्यातूनच त्यांनी गतिमंद आणि दिव्यांग व्यक्तींसाठीच्या कार्यासाठी स्वतःला पूर्णतः झोकून दिले. या सर्व कामात त्यांची पत्नी योगिता यांनीही त्यांना समर्थ साथ दिली.

असो! त्यांनी मतिमंद मुलांच्या बालगृहातील 17 विद्यार्थ्यांच्या पालकांचा आधारकार्डद्वारे शोध घेऊन, त्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले. दिव्यांग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्यामुळे चैन्नई येथे ‘डॉक्टरेट’ ही पदवीही त्यांना प्रदान करण्यात आली. सध्या कल्याण येथे स्थायिक असलेले डॉ. भगवान म्हणतात, “सरकारला विनंती करतो की, महाराष्ट्रातल्या 14 अनाथ गतिमंद बालगृहांना, सेवा शुश्रूषा विभाग तातडीने मंजूर करावा. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी खूप आभार मानतो की, त्यांनी ‘अपंग’ या शब्दाऐवजी ‘दिव्यांग’ हे संबोधन दिले. या दिव्यांग बांधवांच्या अंगभूत गुणांना वाव देऊन, त्यांचे जगणे उज्ज्वल करण्याचे काम मी आयुष्यभर करणार आहे.” विशेष मुलांच्या विशेष जगण्यात, माणुसकी आणि यश आणणार्‍या डॉ. भगवान तलवारे यांच्या कर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0