मेट्रो २ अ आणि ७च्या तिकिटात २५ टक्के सवलत - विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी खास सवलत महा मुंबई मेट्रोने दिली माहिती

Total Views |

मुंबई, मुंबई मेट्रो २ अ आणि ७ वरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नियमित प्रवास कार्ड आणि पासवर थेट २५ टक्के सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून याबाबत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आली आहे.

मेट्रो २ अ दहिसर पूर्व आणि अंधेरी पश्चिम मधील डीएन नगरला जोडते, तर लाईन 7 अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व दरम्यान धावते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, अपंग व्यक्तींना वैद्यकीय किंवा अपंगत्वाचे सरकारी प्रमाणपत्र यांसारखी वैध कागदपत्रे सादर करावी लागतील, तर ज्येष्ठ नागरिकांना वयाचा दाखला द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना सवलतीसाठी पात्र होण्यासाठी शाळेच्या ओळखपत्रासह त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे पॅनकार्ड दाखवावे लागेल. ही कागदपत्रे लाईन २अ आणि मार्ग ७ वरील कोणत्याही तिकीट खिडकीवर नागरिक दाखवू शकतात.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.