महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

28 Jul 2025 20:08:20

पिंपरी चिंचवड: लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी मत व्यक्त केेले. डॉ.श्रीपाल सबनीस हे या परिषदेच्या अध्यक्षास्थानी होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पराग काळकर,मातंग साहित्य परिषेदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, अण्णा धगाटे, संदीपान झोंबाडे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. सुनील भंडगे,डॉ.संतोष रोडे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कारा हा डॉ. आगतराव अवघडे, उत्तम दंडीमे, युवराज कलवले,मुरलीधर झोंबाडे, एडवोकेट राणी सोनवणे,सुनिल लांडगे, कमलाकर वढेलकर, डॉ. यशवंत इंगळे, मानसी चिटणीस,डॉक्टर विजय रोडे राजाराम अस्वरे,सुरेश कंक, डॉ. अशोक मोरे,सागर काकडे, गणेश आवटे,ज्योती भिसे, संजय श्रीधर कांबळे,अरविंद भोसले, भारत टिळेकर, शंकर मानवतकर, गणेश भिसे,डॉ.किरण जाधव डॉ बुध्दाजी गाडेकर इत्यादींना प्रदान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0