ढाका येथील अवामी लीगच्या मुख्यालयावर अज्ञातांचा ताबा

28 Jul 2025 17:57:08

मुंबई : बांग्लादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना सरकारच्या पतनानंतर त्यांचा पक्ष 'अवामी लिग'ला इल्सामिक कट्टरपंथींनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. युनुस सरकारच्या काळात पक्षातील कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. अशातच आता 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फॅसिझम अँड जेनोसाइड'च्या बॅनरखाली एक अज्ञात गट ढाक्यातील मध्यभागी असलेल्या अवामी लीगच्या मुख्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील प्रत्येक खोलीची साफसफाई केली जात असून ती कोणाच्या आदेशाने केली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या कामावर देखरेख करणाऱ्या शखावत हुसेन यांचे असे म्हणणे आहे की, बांग्लादेशात झालेल्या हिंसक आंदोलनाला ५ ऑगस्ट रोजी वर्ष पूर्ण होत आहे, त्यापूर्वी साफसफाईचे काम पूर्ण केले जाईल. या ठिकाणी आणखी फॅसिस्ट जन्माला येऊ नयेत, त्यामुळे अवामी लिगचे मुख्यालय ताब्यात घेणे सुरु आहे, आणि याकरीता कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही."
Powered By Sangraha 9.0