ठाकरे गट राज्यपालांच्या दरबारी, मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

28 Jul 2025 15:03:31

मुंबई : उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सोमवार, दि. २८ जूलै रोजी, सकाळी ११:३० वाजता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भातील मागण्या घेऊन ठाकरे गटाचे नेते राजभवनावर दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह सुषमा अंधारेही उपस्थित होत्या.


कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा भर सभागृहात रमीचा डाव, सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांची हाणामारी, आमदार संजय गायकवाड यांची आमदार निवासातील जेवणावरून हाणामारी या प्रकाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही दाखल झाल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0