वॉशिंग्टन, अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने आधुनिक चीपच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाच्या सॅमसंगफ कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे आता चीपनिर्मिती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत.
एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने सॅमसंगफबरोबर ङ्गएआय६फ ही आधुनिक चीप तयार करण्यासाठी १६ अब्ज डॉलर्स किमतीचा करार केला आहे. सॅमसंगफ ही कंपनी टेस्लाफबरोबर ङ्गएआय६फ चीप निर्मितीमध्ये सहकारी असेल, अशी घोषणा मस्क यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरून केली आहे. हा करार २०२५ ते २०३३ या नऊ वर्षांच्या कालावधीसाठी असून, हा करार ङ्गसॅमसंगफच्या २०२४च्या महसुलाच्या ७.६ टक्के इतका आहे.
काही अहवालांनुसार, एआय६फ ही चीप टेस्लाफच्या पुढील पिढीतील ङ्गफुल सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टमम, ऑप्टिमस ह्युमनॉइड रोबोट्सफ आणि ङ्गडोजो सुपर कॉम्प्युटरफसारख्या एआयफ प्रशिक्षण पायाभूत सुविधांमध्ये वापरली जाईल. टेस्लाफ सध्या एआय४फ चिप्स वापरते आहे. सॅमसंगफ जगातील आघाडीची मेमरी चिप निर्माती कंपनी असली तरी, ती कस्टम-डिझाईन केलेले लॉजिक चिप्स देखील बनवते. तरीही आजवर या क्षेत्रात सॅमसंगफला हवे तसे व्यावसायिक यश मिळालेले नाही. त्यामुळे मस्क यांच्याशी झालेला करार हा अतिशय योग्य वेळेत झाला असून, सॅमसंगला देखील त्याच्या फायदाच होणार आहे.