२५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानच्या घरी दाखल!

28 Jul 2025 17:36:59

मुंबई: रविवार दि. २६ जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेकशनिस्ट म्हणून आोळख असलेला आमिर खानच्या वांद्रे् येथील घराबाहेरील व्हिडियो सध्या व्हायरल झाला असून, यात २५ आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी पोहोचल्याची माहिती उघड झाली आहे. २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम ही आमिरची भेट घेण्यासाठी आल्याची चर्चा आहे.

याबाबत, आमिरच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, "२५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम ही घरी येणार असल्याची कोणतीही पुर्व कल्पना आम्हालासुद्धा न्हवती,भेटीमागे नेमके काय कारण आहे? याची आम्हाला माहिती नाही. आम्ही याबद्दल आमिरसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत." असे आमिरची टीम म्हणाली. दरम्यान सध्या सर्वत्र आमिरच्या घरी अचानक २५ अधिकारी का दाखल झाले याबद्दल सर्वाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षभरापासून, आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून चर्चेचा विषय ठरला आहे. दोन घटस्फोट त्यातील दुसरा घटस्फोट हा वयाच्या ५९ व्या वर्षी घेतल्याने आमिर हा चर्चेत आला होता. आता आमिर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार का? असा प्रश्न आमिरच्या चाहत्यांना पडला आहे. स्वत:च्या ६० व्या वाढदिवसानिम्मित आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमिरने गलर्फेंड गौरी सोबतच्या प्रेमाची जाहीर कबूली दिली होती.

अगामी चित्रपटात साकारणार दादासाहेब फाळकेंची भूमिका

बॉलिवूडमधील प्रसिद्द दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या अगामी चित्रपटात आमिर भारतीय चित्रपटांचा जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.

Powered By Sangraha 9.0