पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

28 Jul 2025 13:18:39

पुणे : (Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स अकांऊटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची काय भूमिका असणार, त्यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. आता अखेर २४ तासानंतर रोहिणी खडसे यांनी आपल्या पतीची पाठराखण करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे… प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!"


पुणे पोलिसांनी यानंतर पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टी लवकरच सांगितल्या जातील असेल स्पष्ट केले. या प्रकरणात काही कारवाया सुरू आहेत. त्या कारवायाच्या अंती जे तपासात निष्पन्न होईल, त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनीच केल्याचे सांगितले जात आहे. दोन रूम्स या प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने बूक केलेल्या असल्याचे व्हायरल झालेल्या पावत्यांवरून स्पष्टपणे दिसत आहे.



Powered By Sangraha 9.0