ब्रेकिंग! 'ऑपरेशन महादेव'अंतर्गत पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

28 Jul 2025 14:05:08



नवी दिल्ली : (Operation Mahadev: Three terrorist killed) जम्मू-काश्मीरच्या दाराजवळील लिडवास भागात सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान तीव्र गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.


दुर्गम भागात असलेल्या एका प्रसिद्ध ट्रेकिंग डेस्टिनेशनमध्ये दहशतवादी हालचालींच्या वृत्तानंतर गोळीबार सुरू झाला. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, "ऑपरेशन महादेव" अंतर्गत या प्रदेशातील संशयित दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्यात आला. सध्या ही कारवाई सुरू आहे आणि सुरू असलेल्या कारवाईला बळकटी देण्यासाठी परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.






Powered By Sangraha 9.0