कांदिवलीच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची फसवणूक; खाण्यात 'भेसळयुक्त पनीर' वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस!

28 Jul 2025 13:19:42

kandivali-shocking-case-of-using-fake-paneer-in-food
 
मुंबई: सध्या सोशल मिडीयात कांदिवलीच्या एका हॉटेलमधील एक व्हिडियो व्हायरल झाला असून, त्यात दावा करण्यात आला आहे कि, कांदिवलीतील एक हॉटेल 'भेसळयुक्त पनीर' वापरून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे म्हटले आहे.
 
वायरल झालेल्या व्हिडियोत, या हॉटेलने ग्राहकांना देण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये वापरलेले पनीर हे 'भेसळयुक्त पनीर' असल्याचा दावा करत, खाण्यात वारपरलेल्या या पनीरवर आयोडीन चाचणी करत हे पनीर पनीर शुद्ध की भेसळयुक्त याचा स्पष्ट फरक दाखवण्यात आला आहे. खाद्यपदार्थांतांमध्ये वापरण्यात आलेल्या या पनीरचा रंग आयोडीन चाचणीत बदलेला दिसून येतोय. जो कि, या हॉटेलच्या भेसळयुक्त खाण्याचा नमुना म्हणून समोर आला आहे.
 
अलिकडच्या काळात अश्या गैर व फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील
एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्या-त्या क्षेत्रातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील हॉटेल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे पनीर, चीज किंवा इतर खाद्यजन्य पदार्थं हे शुद्ध की भेसळयुक्त आहेत, या गोष्टीची पडताळणी होउन तत्काळ कारवाई करता येईल.
 
दरम्यान,एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर याबाबत म्हणाले कि,“ या पडताळणीत जर कोणते हॉटेल गैरप्रकारात सहभागी असल्याचे आढळले तर अधिकाऱ्यांनी अशा हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करावेत, अधिकाऱ्यांनी शुद्ध अन्नांबद्दल आणि कायद्यातील तरतुदींबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रात कार्यशाळा आयोजित कराव्यात.”
 
 
Powered By Sangraha 9.0