कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले! आता सरन्यायाधीश घेणार निर्णय

28 Jul 2025 18:12:17

नवी दिल्ली: दिल्लीतील कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून, न्यायमूर्ती आर महादेवन आणि जे.बी पद्रीवाला यांच्या खंडपीठाने वृत्तपत्रातीत प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत रेबीजच्या वाढत्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींवर सर्वोच्च न्यायालयाने ही चिंता व्यक्त केल्याची माहिती उघड झाली आहे.

दिल्लीतील अनेक भागात कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात.  वारंवार होणाऱ्या या हल्ल्यातून रेबीज दिल्लीत वाढला आहे. दरम्यान होणाऱ्या या हल्ल्याची गांर्भि‍यता लक्षात घेत आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर स्वतःहून कारवाई केली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती आर महादेवन आणि जे.बी पद्रीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, "दिल्लीतील हजारो कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या समोर आल्या असून होणारे हल्ले हे गंभीर स्वरूपाचे आहेत, दिल्लीतील निष्पाप लोक या हल्ल्यांचा बळी ठरत आहेत. हल्ल्यातून पसरणाऱ्या रेबीजने दिल्लीतील अनेक लोक मृत पावल्याच्या गंभीर घटनासुद्धा घडल्या आहेत. म्हणूनच, आम्ही या गंभीर प्रकरणावर स्वतःहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे."

ते पुढे म्हणाले कि, "आता हे प्रकरण वृत्तपत्रातील बातमीसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर ठेवले जाईल. यावर आवश्यक निर्णय तेच घेतील. असे न्यायमूर्ती आर महादेवन आणि जे.बी पद्रीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0