टिळकनगर बाल विद्या मंदिराचा अमृतपुत्र गौरव समारंभ संपन्न

28 Jul 2025 15:47:38

डोंबिवली : टिळकनगर बाल विद्या मंदिर (प्राथमिक विभाग)चा अमृतपुत्र गौरव समारंभ म्हणजेच मागच्या वर्षी पहिली ते चौथी या इयत्तांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला.

सालाबादप्रमाणे अमृतपुत्रच्या बक्षीस समारंभासाठी संस्थेच्या प्रथेप्रमाणे दरवर्षी हुशार माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो त्या शृंखलेत यावर्षी शाळेचे माजी विद्यार्थी (बी ई एम. बी. ए) सुधांशू वेल्हाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सहकार्यवाह रुपाली साखरे यांनी भूषविले. पाहुण्यांचा सत्कार साखरे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला शाळेच्या माजी मुख्यध्यापिका घैसास, लोकमान्य गुरुकुलच्या मुख्याध्यापिका पावडे आणि टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मुख्याध्यापिका परब या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी सुधांशू वेल्हाळ यांनी मुलांना अभ्यासाबरोबर खेळाला ही महत्त्व द्या, मोबाईल पासून दूर राहा, स्वतःच्या प्रगतीसाठी भरपूर मेहनत करा नक्कीच यशस्वी व्हाल असा सल्ला सुधांशू वेल्हाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.

शाळेच्या मुख्याध्यापिका निरभवणे यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारवे, पाहुण्यांचा परिचय संभूस व ऋणनिर्देश कुलकर्णी यांनी केले.
Powered By Sangraha 9.0