देशामध्ये रोजगार असलेल्यांची संख्या ६४.३३ कोटींवर! - २०१८ मध्ये ४७.५ कोटी लोकांकडे होता रोजगार - केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांची संसदेला माहिती

27 Jul 2025 17:20:56

मुंबई , 
देशामध्ये रोजगारांच्या संख्येत वाढ झाली असून, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताती रोजगार असलेल्यांची संख्या ६४.३३ कोटींवर पोहचली आहे. २०१८ मध्ये ही संख्या ४७.५ कोटी इतकीच होती.

देशामध्ये बेरोजगारीची समस्या असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असते. मात्र, विरोधकांच्या या अपप्रचाराला छेद देणारी माहिती केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेला दिली. त्यांनी सांगितेल्या माहितीनुसार देशात २०२४ मध्ये रोजगार असलेल्यांची संख्या ६४.३३ कोटींवर पोहचली आहे, याआधी २०१८मध्ये ही संख्या ४७.५ कोटी इतकी होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला केएलईएमएस अहवाल राष्ट्रीय स्तरावरील उत्पादन क्षेत्रासह रोजगाराचे अंदाज प्रदान करतो. याच्याच आधारे शोभा करंदजाले यांनी सभागृहाला देशातील रोजगाराच्या स्थितीची माहिती दिली.

तसेच नवीन वार्षिक कामगार दल सर्वेक्षण अहवालानुसार देशात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील महिला कामगारांचे प्रमाण अंदाजे २०१९-२० मध्ये २८.७ टक्के, २०२०-२१ मध्ये ३१.४ टक्के,, २०२१-२२ मध्ये ३१.७ टक्के, २०२२-२३ मध्ये ३५.९ टक्के आणि २०२३-२४ दरम्यान ४०.३ टक्के असल्याची माहितीही त्यांनी यावेळी संसदेसमोर सादर केली. त्याचवेळी विविध स्तरावर रोजगाराबाबत चालवलेल्या सर्व अफवांचाही समाचार घेतला. तसेच कामगार मंत्रालयाच्या अधिकृत डेटावर घेतलेल्या शंका आणि उपस्थित करण्यात आलेले प्रश्न निरर्थक असल्याचेही शोभा यांनी सांगितले.

देशातील रोजगाराची परिस्थिती


- सेवा क्षेत्राचा वाटा आर्थिक वर्ष २०१४ मध्ये ५०.६ टक्क्यांवरून वाढून आर्थिक वर्ष २५ मध्ये ५५.३ टक्क्यांवर.

- आर्थिक वर्ष २३ ते आर्थिक वर्ष २५ मध्ये सेवा क्षेत्राची वृद्धी ८ टक्के

- आर्थिक वर्ष २५ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १२.८ टक्क्यांनी सेवा निर्यातीत वाढ झाली

- ग्लोबल केपेबिलीटी सेंटरमार्फत १९ लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त

- उत्पादन क्षेत्रात २०१४ ते २०२३ दरम्यान वार्षिक १.६% दराने रोजगार निर्मिती, २००५ ते २०१४ दरम्यान हाच दर ०.७%
Powered By Sangraha 9.0