मुंबई : दंड संहितेच्या कलम ४९८-अ (छळवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत एखाद्या महिलेला तिच्या काळ्या रंगावरून तसेच व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही म्हणून टोमणे मारणे हा छळ ठरत नाही. अशाप्रकारचे टोमणे मारणे भारतीय गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत नाही, असा निर्णय न्या. श्रीराम मोडक यांनी दिला. त्यामुळे आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
सदर घटनाक्रमानुसार १९९८ साली सातार्यात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. तीच्या पित्याचे म्हणणे होते की तीच्या काळ्या वर्णावरून आणि तीला स्वयंपाक करता येत नाही असे म्हणत तीचा पती तीला सातत्याने टोमणे मारायचा.वाद घालायचा या सगळ्या मानसिक छळाला कंटाळून तीने आत्महत्या केली. त्याच आरोपावरून सातारा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती मोडक यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी न्या मोडक म्हणाले की सदर वाद हे वैवाहिक जीवनातून उद्भवणारी भांडणे आहेत. एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याइतपत याला गंभीर म्हणता येणार नाही.