जेएनयु मधील अर्बन नक्षलींचा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध - राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांचा आरोप

25 Jul 2025 20:35:41

नवी दिल्ली,  जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन लक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयूमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्रा’चा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासनचे उद्घाटन झाले. यावेळी या कार्यक्रमास विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा असल्याचा आरोप विद्यापीठातील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांच्या मते डाव्या विद्यार्थी संघटनांनी भाषिक वादाच्या कारणाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने केली. मात्र ही निदर्शने मुख्यमंत्र्यांविरोधात नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या विरोधात होती. याद्वारे डाव्या संघटनांनी पुन्हा एकदा हिंदुत्व द्वेष प्रकट केल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला आहे.

डाव्यांच्या अराजकते विरोधात राष्ट्रवादी विचाराच्या मराठी विद्यार्थ्यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळांनी शनिवारी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे जाऊन संबंधित खासदारांना प्रत्यक्ष पत्रे सादर करत आहे आणि या विषयाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

अर्बन नक्षल्यांविरोधात कारवाई व्हावी - शांभवी थिटे, रिसर्च स्कॉलर

‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन यास डाव्या विद्यार्थी संघटनांनी विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा दाखवून दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डाव्यांच्या अराजकतावादी अजेंडास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांना डाव्या विचारांचे विद्यार्थी धमकावत असल्याचाही प्रकार घडला आहे.
Powered By Sangraha 9.0