धक्कादायक !...लोकल मधील दोन महिलांची भांडणं ; रागातून...एका महिलेचा थेट उडी घेण्याचा प्रयत्न

25 Jul 2025 17:05:50

shocking-two-women-fighting-in-local-womans-attempt-to-take-jump-
 
मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल मधील प्रवास हा जिररीचा विषय बनला आहे. लोकलमधील गर्दी, चौथ्या सीटवरून होणारी भांडण, धक्का दिला या कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या या गोष्टी मुंबईकरांना नव्या नाहीत. आता महिला प्रवासी डब्यातील अशीच एक घटना वायरल व्हिडियोतून समोर आली आहे.
 
सोशल मिडियात वायरल झालेल्या व्हिडियोत, मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ही विरार स्टेशनच्या फलाट क्रमांक ३ वर उभी असलेली दिसून येत असून, प्लॅटफॉर्मवर महिलांची गर्दी दिसून येत आहे.अशातच या गर्दीचा भाग असलेली एक महिला लोकलखाली उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीतून असे समजते कि, या महिलेचे चर्चगेट ते विरार प्रवासादरम्यान कोणत्यातरी अन्य महिला प्रवासीसोबत भांडण झाले. झालेल्या भांडणातून ही महिला आक्रमक होत लोकलखाली उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.
 
दरम्यान, सध्याच्या काळात मुंबईच्या लोकलमधील भांडण आणि या भांडणाचे होणारे हाणामारीतील रुपांतर या गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरापासून लोकलमधील भांडण, गर्दी, हाणामाऱ्या, मारामाऱ्या यांचे अनेक विडीयो सोशल मिडियात वायरल झालेले दिसून येतात. दरोरोज घडत असलेल्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जाणार? लोकलमधील हे प्रश्न केव्हा सुटणार? हा यानिम्मिताने रेल्वे प्रशासनासमोर निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0