Rain Update: सावधान...! पुढील २४ तास 'या' जिल्ह्यांसाठी रेड अर्लट

25 Jul 2025 13:53:13

rain-update
 
मुंबई: हवामान विभागाने पुढील २४ तास रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली या जिल्हात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रेड अर्लट देण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाला हवामान विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
हवामान विभागाकडून मिळालेल्या सूचनेनुसार संभाव्य आपत्ती अनुषुंगाने रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्हांना जिल्हा प्रशासनाकडून NDRF आणि SDRF तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्हातील एका नागरीकाचा वीज पडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.
 
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा या धरणांचा पाणीसाठा वाढल्याने या धरणातून अनुक्रमे मोडक सागर ४४८८.२५, मध्य वैतरणा २०१२.६७ तर तानसा ३३१५.२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्यातील जगबुडी नदीने पाणी पातळी ओलांडली असून इथल्या नागरीकांना सुरक्षित राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे
 
१) रत्नागिरी ४६.९ मीमी
२)रायगड ७३.३ मीमी
३) चंद्रपुर ३३.७ मीमी
४) भंडारा ३५.३ मीमी
५) गडचिरोली ५०.४ मीमी
 
 
 
Powered By Sangraha 9.0