पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून "माझी माती, माझा बाप्पा" कार्यशाळेचे आयोजन!

25 Jul 2025 18:34:39


मुंबई, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून अलीकडेच त्याला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून ‘माझी माती, माझा बाप्पा’ या नावाने एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रदर्शन दालनात ही कार्यशाळा पार पडणार आहे. सदर कार्यशाळा सशुल्क असून, वय ५ ते ११ वर्षे या वयोगटासाठी १५००/- रुपये व १२ वर्षांपासून पुढच्या वयोगटातील लोकांसाठी १८००/- रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कार्यशाळेत १० इंचांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला जाणार असून, सर्व साहित्य आयोजकांकडून पुरवले जाईल. शाडू मातीच्या मूर्ती घरी नेऊन सुकविल्यानंतर रंगभरणी करता येईल, यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमामुळे सर्वांनाच पर्यावरणाविषयी जागरूकतेचा अनोखा अनुभव मिळणार आहे. घरचा गणपती स्वतःच्या हाताने घडवण्याचे समाधान आणि आनंद हाच या कार्यशाळेचा खरा गाभा आहे. मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करावी व कलात्मक आणि पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती घडवण्यात सहभागी व्हावे. नोंदणीसाठी ९८१९८२५४०२, ८१६९८८२८९८ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.
Powered By Sangraha 9.0