पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट , शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर
25-Jul-2025
Total Views |
खानिवडे: हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना आज शनिवार दिनांक२६जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत तशा प्रकारचे परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ रोजी ऑरेंज आणि दिनांक २६ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना २६ जुलै रोजी सुट्टी जाहिर करण्यात येत आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी परिपत्रकात म्हटले आहे.