मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
25-Jul-2025
Total Views | 30
मुंबई : राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वातावरण तापले असताना अभिनेत्री केतकी चितळे हिने एक वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? असा सवाल तिने केला आहे. या विधानानंतर तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वातावरण तापले असताना अभिनेत्री केतकी चितळे हिने एक वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? असा सवाल तिने केला आहे. या विधानानंतर तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
केतकी चितळेने एक व्हिडीओ पोस्ट करत मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ती म्हणाली की, "अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा क्रायटेरिया २०२४ मध्ये काढून टाकण्यात आला. मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या.
"माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितले की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाही आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे. पण ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त असुरक्षितता वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे, दर्जा पाहिजे यामुळे असुरक्षितता आणखी वाढते. मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी कसे येत नाही. अरे, तो बोलेल नाहीतर नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना? तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. त्याने काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही." असे ती म्हणाली.