विक्रमादित्य मोदीजी! अद्भुत, अद्वितीय, अचंबित करणारा ऐतिहासिक प्रवास; केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

25 Jul 2025 13:25:11



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे. यावर विक्रमादित्य मोदीजी, अद्भुत, अद्वितीय, अचंबित करणारा ऐतिहासिक प्रवास अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, "विक्रमादित्य मोदीजी. एक नवा किर्तीमान स्थापित. नॉन स्टॉप ४०७८ दिवस पंतप्रधानपदी कार्यरत. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४ हजार ७८ दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळण्याचे रेकॉर्ड स्थापित केले आहे. आता मोदीजी हे भारताचे दुसरे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहिलेले नेते बनले आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत केलेला हा विक्रम खरेच भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे."

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे! धुळ्यात विरोधक आक्रमक

"माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहण्याच्या विक्रमाला त्यांनी मागे टाकले आहे. इंदिराजींनी जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ या कालावधीत सलग ४ हजार ७७ दिवस पंतप्रधान म्हणून काम केले होते आणि आता पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधानपदी सलग ४ हजार ७८ दिवस सलग काम करून विक्रम केला आहे," असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांची झळाळती कामगीरी!

पंतप्रधान मोदीजींनी जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला आहे. राज्याच्या आणि केंद्रातील सरकारचे निवडून आलेले प्रमुख म्हणून मोदीजींच्या नावे सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम आधीच आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. तसेच, केंद्रात दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते एकमेव गैर-काँग्रेसी नेते आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतातील एकमेव नेते आहेत, ज्यांनी पक्षाचे नेते म्हणून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. यात २००२, २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुका, तसेच २०१४, २०१९ आणि २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकांचा समावेश आहे. अद्भुत , अद्वितीय...अचंबित करणारा हा ऐतिहासिक प्रवास आहे, असेही केशव उपाध्ये म्हणाले.




Powered By Sangraha 9.0