मुंबई : मध्य प्रदेशातील भोपाळच्या बाणगंगा भागात इस्लामिक कट्टरपंथींच्या दबावामुळे हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचा दावा केला जातोय. स्थानिक हिंदू कुटुंबांचा आरोप आहे प्रेम नगरमधील मुस्लिम समुदायाचे लोक हिंदूंच्या घरासमोर शिवीगाळ करतात, गोंधळ घालतात आणि तलवारीचा धाक देखील दाखवतात. ज्यामुळे त्यांना परिसर सोडण्यास भाग पाडले जात आहे. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने बाणगंगा परिसरात निषेध केला आणि हनुमान चालीसा पठण केले.
संस्कृती बचाओ मंचशी संबंधित चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, बाणगंगा परिसरात, महिलांवर दररोज होणारे अत्याचार आणि हिंदू समुदायाच्या घरांमध्ये तलवारी घेऊन येणाऱ्या मुस्लिम गुंडांच्या धमक्यांमुळे हिंदू कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. त्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावले होते की मुस्लिमांकडून होणाऱ्या छळामुळे ते त्यांची घरे विकत आहेत.
चंद्रशेखर तिवारी यांनी आरोप केला की बाणगंगा परिसरातील दुआ के घर नावाच्या परिसरात एका मुस्लिम तरुणाकडून गुंडगिरी केली जात आहे. त्याने हिंदू कुटुंबांना इतका त्रास दिला की त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले. अशा समाजकंटकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. पोलिसांच्या माहितीनुसार परिसरात अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.