शिव मंदिरासाठी युद्ध सुरू

24 Jul 2025 21:47:14

आम्ही धर्मांतरण केले, आता आम्ही हिंदू नाहीत. आम्ही देवाला मानत नाही’ वगैरे ठासून सांगणारे लोक मला नित्यनियमाने भेटतात. आपापल्या श्रद्धा असतात. त्यामुळेच तेव्हा मी त्यांच्या मतांचा आदरच करते. मात्र, कंबोडिया आणि थायलंड हे बौद्ध धर्मीय दोन देश. कंबोडियातले भगवान शिवाचे प्रीह विहियर मंदिर आणि भगवान विष्णुचे अंगकोर वाट मंदिर हे कुणाचे, या विवादातून थेट युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. एकमेकांचे शत्रू झाले आहेत. या दोन देशांमधील युद्धामागचा सांस्कृतिक संदर्भ पाहण्यासारखा आहे.

कंबोडियामधले प्रीह विहियर मंदिर हे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे, अशी २००८ साली कंबोडियाने मागणी केली. मात्र, कंबोडियाच्या शेजारी देशाचे म्हणजे थायलंडचे म्हणणे असे की, या मंदिरावर कंबोडियाचे अधिपत्य नाही, तर ते मंदिर थायलंडचे आहे. याआधीही हा विवाद होताच. मात्र, या विवादाने पेट घेतला आणि आज २०२५ साली थेट कंबोडिया आणि थायलंड युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही देश बौद्ध धर्मीय आणि प्रीह विहियर मंदिर हे शिवमंदिर! भारतीय धार्मिक आस्था आणि संस्कृतीची पाळेमुळे अशी जगभरात रूजली आहेत, तर कंबोडिया आणि थायलंड यांच्या सीमारेषेवर हे मंदिर आहे. या मंदिराचा ऐतिहासिक मागोवा घेतला, तर जाणवते की, नवव्या शतकामध्ये खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी हे भगवान शिवाचे मंदिर बांधले होते. पुढे १९०० ते १९५३ सालापर्यंत कंबोडिया फ्रान्सिसी शासनाच्या अधीन होता, तर इंडोनेशियावर १९४९ सालापर्यंत डच शासन होते. १९५४ साली फ्रान्सने कंबोडियामधून काढता पाय घेतला. त्यावेळी डचांनी पुन्हा प्रीह विहियर मंदिरावर कब्जा करायला सुरुवात केली. त्यावेळी कंबोडियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली. १९६२ साली हे मंदिर कंबोडियाचे आहे, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. मात्र, त्यानंतरही इंडोनेशियाने या मंदिरावरचा हक्क सोडला नाही.

इतकेच काय कंबोडियामध्ये अंगकोर वाट मंदिर आहे. या मंदिराबाबत कंबोडियाच्या सांस्कृतिक मंत्री फोयुंग साकोना यांनी म्हटले की, "थायलंडने बुरीराम येथे फुमान फाह या मंदिराच्या अंतर्गत अंगकोर वाट मंदिरासारखे आहे, नव्हे अंगकोर वाट मंदिराची नक्कलच आहे.” कंबोडियाने त्या मंदिराची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळही इंडोनेशियामध्ये पाठवले. तेव्हा इंडोनेशियाचे सांस्कृतिक अधिकारी खट्टिया चैमनी यांनी उत्तर दिले की, "हे मंदिर अंगकोर वाट मंदिरापेक्षा वेगळे आहे. पण, हे मंदिर निर्माण करण्याची प्रेरणा प्रधान भिक्षूकडून मिळाली. भिक्षूने स्वप्न पाहिले की, ते गेल्या जन्मात सैनिक होते. ते बारावे शतक होते आणि त्यांनी त्या जन्मात अंगकोर वाट मंदिर बनवण्यासाठी काम केले होते.” थोडक्यात, कंबोडियाचे अंगकोर वाट मंदिर बनवण्यामध्ये इंडोनेशियाची मदत होती, असेच त्यांचे म्हणणे. हे मंदिर जगातले सगळ्यात मोठे भगवान विष्णुचे मंदिर आहे. या मंदिरासाठीही थायलंड आणि कंबोडिया हे दोन बौद्धधर्मीय देश भांडतायत. अर्थातच, कंबोडिया काय किंवा थायलंड काय, त्यांचा आणि आपलाही धार्मिक सांस्कृतिक वारसा एकच आहे.

असो. इंडोनेशिया आणि कंबोडिया हे दोन्ही देश सीमारेषा विवादावरून युद्ध करतात, हे अर्धसत्य. कारण, या दोन्ही देशाचा विवाद आहे तो सांस्कृतिक अधिपत्यासाठी. हे दोन्ही देश थेरवादी बौद्ध आहेत. किकबॉक्सिंग आणि अप्सरा नृत्य ही त्यांची सांंस्कृतिक विरासत आहे, असे मानतात. दोन्ही देशांची खानपान संस्कृती अगदी भाषा, लिपीही सारखीच. मात्र, या दोन्ही देशांना वाटते की, हे सगळे सांस्कृतिक घटक त्यांच्या देशाचे होते आणि दुसर्या देशाने त्याची नक्कल केली. कंबोडियाला वाटते की, त्यांची खमेर संस्कृती प्रमुख होती, थायलंडच्या सयामींनी ती संस्कृती स्वीकारली, तर थायलंडला नेमके याच्या उलट वाटते. याच सांस्कृतिक अधिपत्यासाठी या दोन देशांमध्ये दुरावा आला आणि आता तो युद्धापर्यंत पोहोचला आहे. थायलंडच्या तुलनेत कंबोडिया लष्करीदृष्ट्या दुर्बलच आहे. हे युद्ध किती दिवस चालेल हे काळच ठरवेल. पण, शिवमंदिर प्रीह विहियरच्या अधिपत्य वादातून दोन देशांचे युद्ध झाले, या परिक्षेपात भारताच्या देदीप्यमान ऐतिहासिक, धार्मिक कालखंडाची आठवण झाली इतकेच!
Powered By Sangraha 9.0