मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाच्या महिला आघाडीच्या राजकीय मार्गदर्शक पदी सौ सीमाताई आठवले यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच नवी दिल्ली आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून सीमाताई आठवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मंजू छीबेर यांची अधिकृत निवड करण्यात आल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी जाहीर केले
सौ.सीमाताई आठवले या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विविध पत्नी आहेत. यांनी अनेक वर्ष रिपब्लिकन महिला आघाडीला मार्गदर्शन केलेले आहे. सौ सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन महिला आघाडीचे संघटन वेगाने वाढून मजबूत झालेले आहे त्यामुळे सीमाताई आठवले यांची रिपब्लिकन महिला आघाडीच्या राजकीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याने देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील महिला आघाडीच्या उपाध्यक्ष नैनाताई वैराट यांनी सीमाताई आठवले यांची महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी सौ सीमाताई आठवले यांचे महिला आघाडीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून देशभरातून सौ सीमाताई आठवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.