सावनेर व कळमेश्वर ब्राम्हणीसाठी तीन महिन्यात विकास आराखडा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

24 Jul 2025 20:13:55

मुंबई , सावनेर व कळमेश्वर ब्राम्हणी येथील प्रलंबित विकास आराखडा तातडीने पूर्ण करुन तो तीन महिन्यात सादर करावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार आशीष देशमुख आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकास आराखड्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन आराखड्यामधून उपलब्ध करण्यात यावा. नगरपालिकांनी देखील तातडीने ही कारवाई पूर्ण करावी. तसेच नगरसंचालकांनी स्वतः प्रत्यक्षात नागपूरला भेट देऊन पाहणी करावी अशा सूचनाही यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी केल्या.
Powered By Sangraha 9.0