नवी दिल्ली: ईडीकडून 'मिंत्रा'विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिंत्राने थेट परकीय गुंतवणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. मिंत्रा विरुद्ध ईडी चा असा आरोप आहे कि, कंपनीने घाऊक रोख व्यवहारच्या नावाखाली मल्टी-ब्रँड रिटेल व्यवसाय करत १,६५४ कोटी रुपये कमवले आहेत. जे एफडीआय नियमांच्या विरुद्ध आहे. असा आरोप ईडी ने केला आहे.
ईडीने दाखल केलेल्या गुन्हानुसार , प्रत्यक्षात मिंत्रा कंपनी ग्राहकांना थेट कपडे विकण्याऐवजी मोठ्या प्रमाणात घाऊक रोख वस्तू खरेदी आणि विक्री करण्याचे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले. एफडीआयच्या कोणत्याही धोरणानुसार अश्याप्रकारे कंपनीला विक्री करण्यास मान्यता नाही. ईडीचा असाही आरोप आहे कि, एफडीआय नियमांकडे दुर्लक्ष करून अधिकाअधिक गुंतवणूक मिंत्राने मिळवली, मिंत्राने चुकीच्या पद्धतीचा वापर करत एफडीआय नियम मोडले. ज्यामुळे परकीय चलन व्यवस्थापन कायदा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.
दरम्यान, याबाबत ईडीने म्हटले की, " परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कलम १६ (३) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे." महत्वाचे म्हणजे ईडीकडून मिंत्राची ही चौकशी अशा वेळी होत आहे जेव्हा भारतात कार्यरत असलेल्या मिंत्रासारख्या ई-कॉमर्स कंपन्या विशेषतः परदेशी गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यावर एफडीआय नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप करताना दिसून येतात.