मुबंई : मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट 'सैयारा'ने पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. या चित्रपटाच्या कथेने सर्वांना रडवले. 'सैयारा' हा भारतातील बहुभाषिक चित्रपट नसूनही या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसात १३२ कोटी रुपयांची कमाई केली.
या चित्रपटाचे सिनेमागृहातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत सिनेमा पाहताना तरुणाई अक्षरक्ष : रडताना दिसून येत आहेत. परंतू, आता नेटकऱ्यांनी तरुणाईला चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून येते.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओतील दृष्य पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करत लिहिले की, "हे कसले भारतीय तरुण? हे काय भारताला पुढे घेउन जाणार? यापेक्षा त्यांनी जरा चीन-अमेरिकेच्या तरुणांना पहावे त्यांचा आदर्श घ्यावा ते काय करत आहेत. नाहीतर तुम्ही पहा." अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी व्हिडिओतील युवा पिढीला ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.