कर्नाटक : दावणगिरी येथे दि. २१ जून रोजी अखिल भारतीय वीर शैव महासभेचे आयोजन केले होते.त्यावेळी समाजाचे पाचही जगद्गुरु एकत्र एका व्यासपीठावर आले. सर्वच जगद्गुरु यांनी वीरशैव लिंगायत हे सनातन धर्माचाच भाग आहे असे सांगितले. श्रीशैलजगद्गुरु यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की वीरशैव आणि लिंगायत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच त्यांनी वीरशैव लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक भाग आहे असे या संमेलनामध्ये जाहीर केले. श्रद्धेय रंभापुरी जगद्गुरु महास्वामीजीनी वीरशैव लिंगायत मधील वेगवेगळ्या जाती हे यामध्ये फरक न करता सर्वजण एकच आहोत असे व्यक्त केले. त्यासंदर्भात त्यांनी महात्मा बसवेश्वर यांनी लिहिलेल्या वचनांचा उल्लेख केला. पुढे ते म्हणाले की वीरशैव लिंगायत समाज हा एकत्रित राहिला पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकेल. वीरशैव विटाचार्य व शिवाचार्य संघ सम्मेलन यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असे सांगितले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत पालक हेमंतराव हरहरे गुरुराज चरंतीमठ अण्णाराय बिरादार राजू काका हिरेमठ संतोष यादवाडे सतीश पाटील गजानन धरणे डाॅ. शंकर मुगावे श्रावण जंगम सहभागी झाले होते.