हरिद्वारात पोहोचलेल्या कावाडींची संख्या चार कोटींच्या पार!

23 Jul 2025 18:02:19

मुंबई : उत्तर भारतात सुरु असलेल्या कावड यात्रेदरम्यान आतापर्यंत सुमारे ४ कोटी १० लाख शिवभक्तं हरिद्वार येथे पोहोचले आहेत. दि. २३ जुलै हा कावड यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने गंगाजल गोळा करण्यासाठी लाखो कावाडी हरिद्वार येथे पोहोचले होते. येत्या काळात भाविकांची गर्दी काही प्रमाणात कमी होत जाईल, असे सांगितले जात आहे.

कावाडींच्या आगमनाने हरिद्वारचा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. याठिकाणी उपस्थित काही कावाडी गंगाजल घेऊन आपापल्या शिवमंदिरांच्या दिनेशे प्रस्थानसुद्धा करत आहेत. महिला, वृद्ध, मुले आणि तरुण कावाडी भगवान शिवाचा जयजयकार करतायत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरीचा पोलीस प्रशासनदेखील सतर्क असून, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0