मुंबंईत पावसाची तुफान बँटिंग! उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा

23 Jul 2025 17:35:22

mumbai-rain-storm
 
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात सध्या पावसाची तुफान बँटिंग सुरू आहे. मुंबईतील सर्वच भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
 
आठवड्याच्या सुरुवातीलाच धो-धो कोसळणाऱ्या पावसाने नोकरदार वर्गासहित सर्व मुंबईकरांची तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
 
बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई उपनगरातील विशेषत: अंधेरी, सांताक्रूझ, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, बोरिवली आणि मालाड या भागांना झोडपून काढले आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसाने अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे उपनगरातील मुख्य मार्ग असलेल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंक रोडवर मुंबई शहराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
 
मुंबईच्या लाईफलाईनला पावसाचा फटका!
 
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकललाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सततच्या पावसाने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0