बीड : (Mahadev Munde Case) बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला २० महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अशातच महादेव मुंडे यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या नऊ पानांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महादेव मुंडेच्या शवविच्छेदन अहवालातून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. मुंडे यांचा गळा कापल्याचे तसेच त्यांच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर असे एकूण १६ वार करण्यात आल्याची माहिती अहवालातून मिळाली आहे.
अतिरक्तस्त्राव झाल्याने धक्क्यात जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात केलेली आहे. गळ्यावर २० सेंमीपर्यंत लांब, ८ सेंमीपर्यंत रुंद आणि ३ सेंमी खोल असा हा वार करण्यात आला होता. मानेवर उजव्या बाजूने ४ वार, प्रतिकार करताना हातालाही जखमा झाल्या आहेत.
महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी भर दिवसा निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर २२ ऑक्टोबर रोजी परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांना पंचनामा केला असता त्यात अंगावर गंभीर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या हत्येनंतर गेल्या वीस महिन्यांमध्ये आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आरोपी मोकाट असल्यामुळे महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन करुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.
महादेव मुंडेंच्या शरीरावर कुठे आणि किती वार?
१) मानेच्या उजव्या चार वार
२) तोंडापासून गळ्यापर्यंत एक वार
३) उजव्या हातावर तीन आणि डाव्या हातावर तीन वार
४) तोंडावर एक वार
५) नाकावर एक वार