कल्याण : केडीएमसीच्या शिक्षण विभाागकडून आता घर घर संविधान उपक्रम विस्तृत स्वरुपात राबविला जाणार आहे.
महापालिकेकडून नुकतेच मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन केेले होते. त्यासाठी महापालिका शाळेच्या ६० मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून २०२४ पासून हा उपक्रम सुरु आहे. महापालिकेच्या सर्व शाळात हा उपक्रम रबाविला जात आहे. त्याचे विस्तृत स्वरुपात रुपांतर केले जाणार आहे.
यावेळी संविधानाचे अभ्यासक नूरखा पठाण यांनी महत्व संविधानाचे पटवून दिले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा. महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी समिती गठीत केली. सर्व सीआरसी प्रमुख आणि सर्व मुख्याध्यापक यांना या कार्यक्रमाचे नियोजन करायला सांगितलेले आहे.
घर घर संविधान हा उपक्रम महापलिका हद्दीत संविधानाचे महत्त्व सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. यामुळे विद्यार्थी तसेच पालक सुद्धा आपल्या संविधानाच्या बाबतीत जागरूक होतील अशी माहिती शिक्षणाधिकारी सरकटे यांनी यावेळी दिली.