मोठी बातमी! गुजरात एटीएसकडून अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

23 Jul 2025 20:21:16

गांधीनगर : (Gujarat ATS arrests four Al-Qaeda operatives) गुजरात एटीएसने (ATS) अल-कायदाच्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाद्वारे ते अल-कायदा या संघटनेशी विचारधारा पेरण्याचे काम करत होते, अशी माहिती एटीएस डीआयजी सुनील जोशी यांनी दिली. या चार दहशतवाद्यांची एटीएसकडून चौकशी केली जात आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही दीर्घकाळापासून अल-कायदा मॉडेलशी जोडलेले होते. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. काही गटांमध्येही सक्रिय होते. तपासादरम्यान, एटीएस पथकाला असे आढळून आले की, हे चारही जण गुजरातमध्ये होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कारवायांबद्दल सतत चर्चा करत होते. याच संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसला त्यांच्या काही सोशल मीडिया हँडल्स आणि चॅट्स देखील सापडले आहेत.

झीशान, फरदीन, सैफुल्ला आणि फारिक अशी या आरोपींची नावे असल्याची माहिती आहे. या अटकेमुळे एक मोठा कट उधळण्यात आला आहे. एटीएसने यातील तीन दहशतवाद्यांना गुजरातमधून तर एका दहशतवाद्याला दुसऱ्या राज्यातून अटक केली आहे. गुजरात एटीएसचे हे मोठे यश मानले जाते. भारतात मोठा घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र हा डाव आता उधळला गेला आहे.




Powered By Sangraha 9.0