
कल्याण : कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकूळ झा ला मंगळवारी उशीरा सर्तक नागरिकांमुळे पोलिसांनी अटक केली. बुधवारी 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला आणि त्याचा भाऊ रंजीत या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकित्सालय रुग्णालयात एका रिसेप्शनिस्ट तरूणीने आरोपी गोकूळ झा याला डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत. जरा थांबा, असे सांगितले. त्यानंतर संतापून गोकूळ झा याने त्या तरूणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तरूणीला मारहाण करणाऱ्या गोकूळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपीचा शोध घेत होते. मंगळवारी उशीरा गोकूळ झा यासह त्यांच्या भावाला पकडण्यात पोलिसांनी यश आले. पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी गोकूळ झा आणि त्याच्या भावाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी पिडीत तरूणीचे वकील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, सरकारी वकिलांचा युक्तीवाद सुरू असताना आरोपीने बुरखा काढला. आणि तो अरेरावी करू लागला. पोलिसांना धक्काबुक्की करत होता. त्यावर न्यायाधिशांनी त्याला ताकीद दिली. हा तमाशा बंद कर तुला कोर्टाच्या कामकाजात योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर तो शांत झाला. या आरोपीविरुध्द मारमारीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असून त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांनी आरोपीची सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे असे त्यांनी सांगितले.