मुंबई : अहिल्यानगर येथे उबाठा गटाच्या एका नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळे असे त्यांचे नाव असून ते शहरप्रमुख असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
एका २१ वर्षीय विवाहित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात किरण काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या महिलेला मदत करण्याचे आमिष दाखल किरण काळे याने २०२३ ते २०२४ पर्यंत तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तिने केली आहे. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फिर्यादीत पीडित महिलेने किरण काळेवर गंभीर आरोप केले आहेत. मदत करण्याच्या बहाण्याने गैरफायदा घेतल्याचे तिने म्हटले आहे. किरण काळे याने त्याच्या संपर्क कार्यालयात वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे.