माणिकराव कोकाटेंचे वर्तन भूषणावह नाही – मुख्यमंत्री

21 Jul 2025 21:37:01

मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या कामकाजात गांभीर्याने सहभागी होणे अपेक्षित असताना असे वर्तन भूषणावह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “विधानभवनात चर्चा सुरू असताना सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ योग्य नाही. त्यांनी खुलासा दिला असला, तरी हे वर्तन आम्हाला भूषणावह वाटत नाही.”

संजय राऊत यांनी हनी ट्रॅपविषयी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, “लोढांसोबत (प्रफुल्ल) सर्वांचेच फोटो आहेत, शरद पवारांसोबतही आहेत. अशा फोटोंमुळे काही सिद्ध होत नाही. बिनबुडाचे आरोप करत राहणे योग्य नाही. अशा वायफळ प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. अशी विधाने करताना पुरावेही सादर करावेत. मी विरोधी पक्षनेता असताना केलेले सर्व आरोप पुराव्यांसह होते आणि एकही आरोप मागे घ्यावा लागला नाही किंवा खोटा ठरला नाही,” असे ते म्हणाले.





Powered By Sangraha 9.0