लोककल्याणकारी नेता!

21 Jul 2025 19:18:44

कोणताही मुलाहिजा न ठेवता, ते कठोर निर्णय घेऊ शकतात. लोकहितापुढे ते सर्व मोह त्यागू शकतात. समर्पण, त्याग, न्यायी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये मला जाणवली. मैत्री कशी जपावी, याचा ते वस्तूपाठ आहेत. शब्द देतानाच तो पाळण्याचे बंधनही ते स्वतःला घालून घेतात. सध्या महसूल विभागात होत असलेल्या बदलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. ते अनेक लोककल्याणकारी योजना व त्यांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी सतत आग्रही असतात. प्रत्येक निर्णयामागे अंत्योदयाचा विचारफ आणि देवेंद्रजींचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प आहे.

महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विधिमंडळ संयुक्त चिकित्सा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे विधेयक समाजाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च आहे. समितीचे कामकाज करताना मला माझ्या 21 वर्षांच्या विधिमंडळ कामकाजातील एक वेगळा अनुभव मिळाला. महाराष्ट्रातील सर्वांचेच या विधेयकाकडे लक्ष वेधून होते. कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, ही दक्षता तर घ्यायचीच होती. त्याचवेळी भारतीय संविधानाचे रक्षण करायचे होते. कडवी डावी विचारसरणी असलेले व भारतीय संविधानाविरुद्ध चीड निर्माण करणारे लोक आपल्या समाजाची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीविरुद्ध कायदेशीरदृष्ट्या दोन हात करण्याची तयारी सरकारने यानिमित्ताने केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरुद्ध ही लढाई सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या भागात अनेकदा ते मुक्कामी असतात. त्यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याच प्रयत्नांची पुढची पायरी म्हणजे, विशेष जनसुरक्षा विधेयक. जंगलात असलेला क्रूर नक्षलवाद आता शहरात आला आहे. त्याचे स्वरूप पांढरपेशे असल्याने समाजासाठी ते अधिक काळजी करणारे आहे. समाजविघातक कारवाई करणार्‍या 64 संघटना महाराष्ट्रात आहेत. आणलेला कायदा हा भारतातील इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यापेक्षा ङ्गप्रोग्रेसिव्हफ आहे. या महत्त्वाच्या कायद्याच्या निर्मितीप्रक्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले, याची पूर्ण जाणीव मला आहे. महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील महत्त्वाचे पान म्हणजे हे कामकाज आहे.

या प्रोत्साहन प्रक्रियेतील बीजे 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा पेरली गेली. मला आठवते, राजकारणात कार्यकर्ता व आंदोलनाचा अनुभव असूनही विधिमंडळाच्या कामकाजाचे बारकावे मला माहिती नव्हते. त्यावेळी देवेंद्रजींनी मला मार्गदर्शन केले. विधिमंडळातील कामकाज कसे हाताळायचे, प्रश्न, लक्षवेधी कशा प्रभावीपणे मांडायच्या, हे समजावून सांगितले. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारी निधी कसा खेचून आणायचा, यासाठी वेगवेगळी संसदीय आयुधे आणि जे कौशल्य लागते, त्याबाबत देवेंद्रजी मला वेळोवेळी सांगायचे. या सगळ्या टप्प्यात व प्रवासात देवेंद्रजींचे मार्गदर्शन व सोबत मला नेहमी लाभत आली आहे. काहींशी जन्माचे ऋणानुबंध जुळतात, पक्की नाती तयार होतात. ही नाती रक्ताच्या नात्यापलीकडची असतात. देवेंद्रजी फडणवीस हे नाते याच पद्धतीचे.

रक्ताच्या नात्यापलीकडचे...

देवेंद्रजींचा सहवास अत्तरासारखा आहे. अत्तर हे नुसते सुगंधी द्रव्यच नाही, तर अत्तर म्हणजे भावना, परंपरा, आपुलकीचा आनंद वाटणारा एक अनमोल घटक. एक सकारात्मक ऊर्जा अत्तराचा सुगंध निर्माण करते. माझ्यासाठी असेच आहेत देवेंद्रजी! महाराष्ट्राच्या राजकारणातला एक बलाढ्य, बुद्धिमान आणि लोककल्याणकारी नेता! त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आता वेगवान झाला.

देवेंद्रजी आणि माझा परिचय मागील 35 वर्षांपासूनचा. मी अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. भारतीय जनता पक्षात मी कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यातील कार्यकर्त्याला घडवले, मला संस्कारित केले आणि माझ्या करिकिर्दीला नवे आयाम देण्याचे काम केले, ते ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी यांनी. नितीनजी आणि माझ्या वयात खूप अंतर होते. त्यामुळे मी कायमस्वरूपी त्यांना पितृस्थानी मानत आलो आहे. बापाचा एकप्रकारचा धाक असतो आणि त्याच्याशी अनेक गोष्टी बोलता येत नाहीत; त्या भावाशी मात्र सहजपणे करता येतात. राजकारणात माझ्या भावाची ही भूमिका जर कुणी पार पाडली असेल, तर ते आहेत देवेंद्रजी! त्यांनी एखाद्या भावाने करावी, तशी माझी पाठराखण केली. ते नेहमीच मला मार्गदर्शन करतात.

2014 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मला ऊर्जामंत्री व उत्पादनशुल्कमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझी ऊर्जामंत्री म्हणून पाच वर्षांची कारकीर्द केवळ त्यांच्या सोबतीनेच यशस्वी झाली, असे आता विचार करताना वाटते. त्या पाच वर्षांच्या काळात देवेंद्रजींकडून अनेक प्रशासकीय बारकावे मला शिकायला मिळाले. आता देवेंद्रजींच्याच विश्वासामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यांचा मी पालकमंत्री आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी त्यांचे भगीरथ प्रयत्न सुरू असल्याचे आपण बघत असतो. गेली तीन वर्षे मी भाजपचा प्रदेश अध्यक्ष होतो. अनेक मान्यवरांनी हे पद भूषविले होते. त्यामुळे थोडेफार दडपण होतेच. देवेंद्रजींनी हे दडपण घालविले. काही वर्षांपूर्वी देवेंद्रजींनीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय दमदारपणे सांभाळली होती. त्यादरम्यानचा त्यांचा अनुभव यावेळी मला त्यांनी सांगितला.

आता राज्याचा महसूलमंत्री म्हणून काम करताना, देवेंद्रजींच्या सर्वांगीण अभ्यासाची पदोपदी जाणीव होते. महसूल विभागात होत असलेल्या बदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. एप्रिल महिन्यात पुण्यात झालेल्या महसूल परिषदेनंतर वेगवान पद्धतीने हा विभाग कामी लागला. अनेक लोककल्याणकारी योजना व त्यांची कालबद्ध अंमलबजावणीसाठी देवेंद्रजी सतत आग्रही असतात. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असल्याने त्याच्या तंदुरुस्तीसाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. मागील सहा महिन्यांत असे अनेक निर्णय महसूल विभागाने घेतले. त्यामुळे सामाजिक सौहार्द जपले जाईल आणि या राज्यातील सर्व घटकांना न्याय मिळेल. अनेक किचकट व कालबाह्य कायदे, तरतुदी बदलत आहोत, सुधारणा करत आहोत. शेतकरी, विद्यार्थी, महिला वर्गाला महसूल विभागात काम करताना सुसह्य व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहोत.

मुळात, आर्थिक नियोजन आणि आर्थिक प्रगतीचे यश समाजाच्या शिडीच्या वरच्या बाजूला असलेल्या लोकांद्वारे मोजले जाणार नाही, तर समाजाच्या सर्वात खालच्या पायरीवरील लोकांद्वारे मोजले जाईल. हा विचार महायुती सरकारचा आहे. पर्यायाने, महसूल विभाग सरकारचा कणा असल्याने आमचाही. गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत शासनाचा संवाद आता अधिक सशक्त आणि परिणामकारक झाला आहे. सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत 1947चा तुकडेबंदी कायदा रद्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दि. 1 जानेवारी 2025 पूर्वीच्या एक हजार चौ. फुटांच्या जमिनींना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. रहिवाशी क्षेत्रातील अनधिकृत तुकड्यांना अधिकृत करण्यासाठी पुढील 15 दिवसांत एसओपीफ तयार केली जाईल. पाणंद रस्त्यांची उभारणी, जिवंत सातबारा मोहीम, वसतिगृह योजना, एक जिल्हा एक नोंदणी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांफतर्गत ङ्गमाझी जमीन माझा हक्क मोहिमेफसाठी समितीचे निर्माण अथवा केवळ तांत्रिक कारणांमुळे घरकुलापासून एकही व्यक्ती वंचित राहता कामा नये, या प्रत्येक निर्णयामागे अंत्योदयाचा विचारफ आणि देवेंद्रजींचा विकसित महाराष्ट्राफचा संकल्प आहे. नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक सुलभतेने होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरफ राज्यभर राबविले जात आहे. 200 रुपयांमध्ये संपूर्ण शेतीची हिस्सेमोजणी व 500 रुपयांमध्ये वाटणीपत्र देण्याचा निर्णय विभागाने घेतला. यातून शेतकर्‍यांचा आर्थिक भार हलका होऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, वारकर्‍यांसाठी विमा योजना व घरकुलासाठी मोफत वाळू हे निर्णय लोककेंद्रित आहेत. यातून एक नव्या महाराष्ट्राचे चित्र उभे राहताना दिसते, जिथे शासन हे फक्त निर्णय घेण्यासाठी नसून, सेवा देण्यासाठीदेखील आहे. पुण्यात झालेली महसूल अदालतफ हजारो प्रलंबित प्रकरणांचा निकाल देणारी ठरली. हा पथदर्शी प्रयोग होता. परिणाम सकारात्मक आल्याने तो आता महाराष्ट्रभर राबविण्यावर भर आहे. याबाबतचे समग्र दिशादिग्दर्शन देवेंद्रजींचे आहे. जनसेवेची भावना घेऊन आम्ही काम करत आहोत. आज जेव्हा एखादी वृद्ध माता आपल्या नातवाचे नाव सातबार्‍यावर पाहते, एखादा शेतकरी आपली वाटणी केवळ 200 रुपयांत करून घेतो किंवा एखादा वारीला जाणारा वारकरी विम्याच्या सुरक्षेत वारी पूर्ण करतो, तेव्हा हा सर्व केवळ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा भाग नसतो, तर सरकारच्या संवेदनशीलतेचे प्रतीकदेखील असते.

देवेंद्रजींना केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या राजकारणाची जाण आहे. त्यांनी अनेक राज्यांत निवडणुकीचे व्यवस्थापन केले. त्यांची अनेक वैशिष्ट्ये, बारकावे आहेत. कोणताही मुलाहिजा न ठेवता, ते कठोर निर्णय घेऊ शकतात. लोकहितापुढे ते सर्व मोह त्यागू शकतात. समर्पण, त्याग, न्यायी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. मैत्री कशी जपावी, याचा ते वस्तूपाठ आहेत. शब्द देतानाच तो पाळण्याचे बंधनही ते स्वतःला घालून घेतात. त्याचबरोबर राजकारणात असावी लागणारी गुप्तता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. त्यांच्या स्वभावातील एक वेगळेपण म्हणजे कोणत्याही भूलथापांना हा माणूस भुलत नाही. खोट्या प्रशंसेला हा माणूस कधी शरण जात नाही आणि त्यांच्या वागण्याबोलण्यात एक तटस्थपणा असतो. या संपूर्ण 35 वर्षांच्या कालावधीत मला त्यांच्याकडून एक गोष्ट शिकता आली. ती म्हणजे, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही अभ्यासू व चौकस असले पाहिजे. लोकांचे प्रश्न सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्यासुद्धा तुम्हाला कळले पाहिजेत.

देवेंद्रजींचे आरोग्यक्षेत्रातील कार्य खूप प्रभावी व अचाट आहे. तसं पाहता मुख्यमंत्री सहाय्यता निधीफची स्थापना 1967 मध्ये झाली. पण, 2015 मध्ये देवेंद्रजींनी त्याला नवे परिमाण मिळवून दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी आर्थिक साहाय्य देण्याचा या निधीचा उद्देश आहे. हृदयविकार, कर्करोग, किडनी आणि यकृत प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट यांसारख्या महागड्या आणि जटिल शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना आधार देण्याचे काम हा निधी करतो. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्यांनाही यातून मदत केली जाते, पण विशेषतः वैद्यकीय साहाय्यासाठी हा निधी रुग्णांचा आधारस्तंभ बनला आहे. 2015 मध्ये देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षफ स्थापन करून या उपक्रमाला गती दिली. या कक्षामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ झाली, पारदर्शकता आली आणि गरजूंना वेळेत मदत मिळू लागली. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर पडताना जीवनदान मिळाले आहे. दि. 31 मार्च 2025 पर्यंत या कक्षामार्फत 7 हजार, 658 रुग्णांना 67 कोटी, 62 लाख, 55 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही आकडेवारी केवळ संख्याच नाही, तर प्रत्येक आकड्यामागे एक माणूस, एक कुटुंब आणि त्यांच्या आशेची कहाणी आहे.

अटल सेतूफ, समृद्धी महामार्गफ, मुंबई कोस्टल रोडफच्या पाठोपाठ मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये एकूण 350 किमीहून अधिक लांबीच्या मेट्रो प्रकल्पांचे जाळे विस्तारत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. ङ्गमुंबई एअरपोर्ट इंफ्लुएंस नोटीफाईड एरिया म्हणजे, आठ लक्ष रोजगारनिर्मिती औद्योगिक वसाहतीचा नैनाफ प्रकल्प, जलयुक्त शिवारफ अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, आपले सरकार पोर्टल, महाराष्ट्रात 11 वर्षांत अनेक नवीन विमानतळे विकसित झाली. यात अमरावती, सिंधुदुर्ग, शिर्डी, नवी मुंबई अशा अनेक विमानतळांचा समावेश असून यामुळे पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला नवे गतिमान प्रवेशद्वार मिळाले आहे. कोल्हापूर, अमरावती, शिर्डी, सोलापूर, नांदेड विमानसेवा सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे निर्माण होणारे सागरी बंदर भारतातील सर्वांत मोठे सागर पोर्ट ठरणार असून, यामुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र बनेल. 76 हजार कोटींचा हा प्रकल्प देशातील आयात-निर्यात व्यापाराला गती देत तीन लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण करत आहे. जलसाठा असलेल्या भागांतील पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये वळवून शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचा नदीजोड प्रकल्पाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि कृषी वाहिनी, निळवंडे, गोसीखुर्द आणि इतर धरणे निर्मिती, मुंबईतील धारावीकरांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्प तयार होत आहे. येत्या सात वर्षांत 50 हजार घरे तयार केली जाणार आहेत. पुणे-नवी मुंबई परिसरात एक आंतरराष्ट्रीय मेगा लॉजस्टिक हब, नागपूर-वर्ध्यामध्ये एक नॅशनल मेगा लॉजस्टिक हब, पाच रिजनल लॉजस्टिक हब, आणि 25 जिल्ह्यांत प्रत्येकी एक लॉजस्टिक नोड्स विकसित केले जातील. ङ्गप्रधानमंत्री आवास योजनेफतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांत 50 लाख कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकारणार आहेत. सर्व घरकुल योजनांसाठी मोफत वाळू देण्याचे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला महिन्याला 1 हजार, 500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. महायुती सरकारने राज्यातील शेतकर्‍यांसाठी शेतीसाठी लागणारी वीज मोफत केली आहे. आता शेतकर्‍यांना एक रुपयादेखील वीजबिल भरावे लागणार नाही. शिवाय थकीत वीजबिलदेखील माफ करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना शून्य रुपये किमतीचे वीजबिल येत आहे. यामुळे 44 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ङ्गप्रधानमंत्री किसान सम्मान निधीफ आणि ङ्गनमो शेतकरी महासन्मान निधी योजनांफअंतर्गत राज्यातील 1 कोटी, 15 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना वार्षिक 12 हजार मिळतात. अनाथ आश्रमात राहणार्‍या मुलांना 18 वर्षांपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले की, अनाथ आश्रम सोडावा लागतो. त्यामुळे पुढील शिक्षण व नोकरी मिळवण्यात अडचणी येतात. त्यांच्यासाठी एक टक्का समांतर आरक्षणाचा या मुलांना शिक्षणासह सरकारी नोकरीतही लाभ होत असल्याचे दिसून येते. मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही; तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम्, सुफलाम् मराठवाडा आपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास खूप बळ देणारा आहे. त्यांचे व्हिजनफ केवळ पायाभूत सुविधांपुरते नाही, तर मराठी भाषा रुजविण्यासाठी त्यांनी काम केले. श्री चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आणि श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ङ्गअवतार दिनफ साजरा करण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णयही सरकारने घेतला.

नेतृत्व रात्रीतून घडत नाही. त्यासाठी ध्यास असावा लागतो. ते नगरसेवक म्हणून ते निवडून आले ते साल होतं 1992! खरं तर ही निवडणूक 1989 मध्ये होणार होती. पण, तेव्हा त्या निवडणुकीत त्यांचं वय भरत नव्हतं. मात्र, त्यांच्या नशिबाने ती निवडणूकच पुढे गेली आणि ते नगरसेवक झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक बलाढ्य, बुद्धिमान आणि लोककल्याणकारी नेता मिळाला. महाराष्ट्र आता वेगवान झाला.

आता थांबणार नाही!

माझा ठाम विश्वास आहे, देवेंद्रजी केवळ भारतीय जनता पक्षाच्याच नाही, तर सार्वजनिक जीवनात काम करीत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. ङ्गराष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतःफ हा भारतीय जनता पक्षाचा विचार केवळ मानत नाहीत, तर जगत असतात. वेळोवेळी त्यांच्या कृतीतून हे दिसतही असते. कष्ट, जिद्द, महाराष्ट्रप्रेमाच्या विश्वासावर एकदा देवेंद्रजींनी गर्जना केली होती.

मेरा पानी उतरता देख,
मेरे किनारे पर घर मत बसा लेना।
मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा।

कर्तृत्वावर हा करिष्मा सिद्ध केला. कितीही अडथळे आले तरी महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगून ते सदैव सकारात्मक आणि प्रसन्न अंतःकरणाने अविश्रांत कार्य करीत असतात, हे मी अतिशय जवळून अनुभवले आहे. प्रतिकूलतेत त्यांनी सर्वांवर मात तर केलीच, पण त्याहून पुढे जात जनतेच्या मनातील आपले स्थान मजबूत केले व सर्वांचे लाडके देवाभाऊ झाले.

मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की, माझ्या जीवनात त्यांच्यासारखे मार्गदर्शक नेतृत्व लाभले. माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी ते सदैव माझ्यासोबत असतात. आपला नात्याचा, भावबंधाचा हात कधीही सुटू देत नाहीत. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो, शिकत आहे. ईश्वराला प्रार्थना इतकीच की, हे मैत्र जिवांचे अबाधित राहो!

वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना, या माझ्या लोकनेत्याला दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो. त्यांची प्रगती हीच आमच्यासाठी आनंदाची कुपी आहे. मला आठवते, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ङ्गनागपूरने महाराष्ट्राला दिलेली भेट..फ असे देवेंद्रजींचे वर्णन केले होते. ते यथार्थच आहे.

(शब्दांकन : रघुनाथ पांडे, माध्यम सल्लागार, मा. महसूलमंत्री, महाराष्ट्र)
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य


Powered By Sangraha 9.0