आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांना जनगौरव पुरस्कार प्रदान!

20 Jul 2025 22:08:42

मुंबई, जनसेवा समिती, विलेपार्लेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासात चंद्रशेखर नेने यांना जनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. २० जुलै रोजी साठे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अभियंता अश्विनी कवीश्वर यांच्या हस्ते चंद्रशेखर नेने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जनसेवा समितीच्या माध्यमातून दर वर्षी दिला जाणारा जनगौरव पुरस्कार यावेळी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, व्याख्याते चंद्रशेखर नेणे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त करताना चंद्रशेखर नेने म्हणाले की " आजच्या बदलता युगात माध्यमांनी सुद्धा कात टाकली आहे. आपल्याला सर लोकांपर्यंत आणि विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचायचं असेल तर वेगवेगळ्या समाजमाध्यमांपासून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो. महाएमटीबी सारख्या यूट्यूब चॅनल्सच्य माध्यमातून ज्या वेळेला एखादा विषय मी लोकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेस असं लक्षात येतं की लोकांना नवनवीन गोष्टी करत आहत लोक प्रगल्भ होत आहेत. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत वेगाने प्रगती करतो आहे. हे स्थित्यंतर लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं " त्याच बरोबर सदर कार्यक्रमात अश्विनी कवेश्वर यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिर निर्मिती प्रकल्पावर आपले अनुभवकथन सादर केले.



Powered By Sangraha 9.0