मुंबईतील शाळांना अचानक धमक्यांचे ई-मेल कसे येऊ लागेलत?

02 Jul 2025 18:55:48

schools in Mumbai suddenly start receiving threatening emails
 
मुंबई : मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या खऱ्या पण, गेल्या दोन महीन्यांत मुंबईतील ११ आंतरराष्ट्रीय शाळांना धमकीचे ई-मेल आले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बाबत मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, हे ई-मेल स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि नॉर्वे सारख्या देशांमधून ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा (व्हीपीएन) वापरून करून पाठवण्यात आले आहे. व्हीपीएन वापराने पाठवणाऱ्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुबंई पोलिसांनी सांगितले.
 
पाठवण्यात आलेले धमक्यांचे ई-मेल जरी वेगवेगळ्या अकाऊंट्सवरुन आले असले तरी त्यातील धमक्यांची पध्दत ही एकसारखीच आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांना या सर्व धमक्यांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा दाट संशय आहे. आतापर्यंत, या प्रकरणात एकूण पाच ‘एफआयआर’ नोंदवण्यात आले आहेत. परंतू; पोलिसांनी सांगितले की, "मुंबईतील एकुण ११ शाळांना लक्ष्य करण्यात आले आहे, ज्यामध्ये डोंबिवलीतील एक आंतरराष्ट्रीय शाळा आणि पवईतील एक प्रमुख शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे."
धमक्या मिळालेल्या शाळांमध्ये विलेपार्ले, डोंबिवली, गोवंडी, कांदिवली, समता नगर, आणि पवई येथील शाळाचा समावेश आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. तर कांदिवली आणि गोवंडी येथील आंतरराष्ट्रीय शाळांना एकाच आठवड्यात सारख्या धमकीचे ई-मेल आले होते. या ई-मेल धमक्याबाबतचा पहिला गुन्हा विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
 
पोलीस प्रशासनाने पालक आणि विद्यार्थ्यांना अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, असे दिसून आले आहे की, या सर्व धमक्यांमागील हेतू हा खऱ्या दहशतीचा नसून तो भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे.
Powered By Sangraha 9.0