माजी आमदार अपूर्व हिरे, प्रवीण माने, अनिल मादनाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश!

02 Jul 2025 19:09:01


मुंबई : नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवार, २ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, राजेश पांडे, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? खासदार नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे ते नातू आहेत. याप्रसंगी नाशिकच्या माजी नगरसेविका शिळा भागवत, तुळशीराम भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरलीधर भामरे, संदीप पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच इंदापूर तालुक्यातील प्रवीण माने यांच्यासह इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, हरणेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चवरे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेश जामदार, अमोल मुळे, अनिकेत इनामदार, बबनराव लावंड आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल मादनाईक यांच्यासमवेत स्वाभिमानीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे, शैलेश आडके, सतीश हेगाणा, सलीम पेंढारी, संजय पाटील, संदीप पुजारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.




Powered By Sangraha 9.0