मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महीन्यांपासून हनीट्रॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. नुकतेच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्दाचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी गुरुवार दि. १८ जुलैला विरोधक हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या सत्तापालटामागे 'हनीट्रॅप'प्रकरण असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी असा कुठलाही प्रकार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याचे म्हटले आहे.
वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले “तत्कालीन सत्तापालटाचे कारण एक सीडी होती. त्या सीडीत अनेक आयएएस, माजी अधिकारी आणि राजकीय व्यक्तीमत्वांची गुपितं दडलेली आहेत. आम्हाला यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आम्ही जर का पुरावे दाखवायचे ठरवले, तर आम्हाला १०-२० हजारांचे तिकीट ठेवावे लागेल आणि ते फुटेज काही ठराविक निवडक लोकांनाच दाखवावे लागेल. एवढा तो भक्कम पुरावा आहे.”