कोपरगाव : संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा याच्यावर पाोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव येथील वनिता विश्वनाथ हरकळ यांना काविळ झाली होती. त्या उपचार घेत होत्या. मात्र कोपरगाव संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा यांनी सांगितले की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. यांना कुठलाही आजार नाही. कोणतेही औषध घेऊ नका. फादरने त्याच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हटले. हे तेल कपाळावर लावायला सांगितले. बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र म्हणत ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले. तसेच दिवसातून तीन-चार वेळेस बाटलीतील पाणी पिण्याचा सल्ला दिला. वनिता आणि नातेवाईकांनी यावर विश्वास ठेवला. औषध बंद करून फादरने दिलेले तेल आणि पाणी शिंपडत राहिले. औषधाचा उपचार न मिळाल्याने वनिता यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. यानंतर वनिता यांच्या मृत्यूस फादर चंद्रशेखर गौडा हे कारणीभूत असल्याची फिर्याद त्यांचे बंधू संजय पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी चंद्रशेखर गौडा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३चे कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.