बीड : पाटोदा तालुक्यातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जमातीतील पारधी समाजातील दिव्यांग लोकेश सोपान पवार आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायी कारवाई विरोधात विवेक विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात कुटुंबासाठी तात्काळ सुरक्षित निवाऱ्याची, पुनर्वसनाची आणि कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. विभाग संयोजक ॲड. प्रबोधन निकाळजे आणि देवगिरी प्रांत समन्वयक अरुण कराड यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेतली. निवेदनात सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था, शासनाच्या नियमानुसार पुनर्वसन, दिव्यांग लाभ योजना लागू करणे, अन्यायप्रकरणी प्रशासनाकडून चौकशी आणि प्रकरण अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे सुपूर्द करणे, अशा मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी अरुण कराड, अविनाश निकाळजे, अक्षय निकाळजे, निलेश जावळे, चेतन जावळे, बबन गिरी, विलास जावळे उपस्थित होते.