जम्मूतील रहिवाशांची ऐतिहासिक कामगिरी; घरांवर बसवले संस्कृत भाषेतील नामफलक

19 Jul 2025 17:41:51

मुंबई  : जम्मूमधील सुभाष नगर विस्तार-१ कॉलनीतील रहिवाशांनी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर संस्कृत भाषेतील नामफलक बसवले आहे. भारतातील आणि कदाचित जगातील हे पहिले उदाहरण ठरले आहे, जिथे कॉलनीतील रहिवाशांनी एकत्रितपणे हे पाऊल उचलले आहे. स्थानिक रहिवाशांनी चालवलेल्या या उपक्रमाचे आधुनिक शहरी वातावरणात भारताच्या प्राचीन भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी एक धाडसी पाऊल म्हणून कौतुक केले जात आहे.

नामफलकांचे सौंदर्य आणि नावांचे अध्यात्मिक महत्त्व यामुळे कॉलनी एका अद्वितीय सांस्कृतिक खुणामध्ये बदलली आहे. यासंबंधित व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, आपली परंपरा आणि ओळख असलेल्या संस्कृत भाषेचा आपण प्रचार केला पाहिजे. ही फक्त नावे नाहीत तर मूल्ये आणि संस्कृती आहेत. या उपक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. भारताच्या इतर भागांमध्ये संस्कृतच्या पुनरुज्जीवनासाठी एक आदर्श म्हणून रहिवाशांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करण्यासाठी अनेक सांस्कृतिक गट वसाहतीत पोहोचत आहेत. जम्मूची ही वसाहत भारताच्या सांस्कृतिक चळवळीला प्रेरणा देऊ शकते, जिथे प्राचीन परंपरा आधुनिक जीवनशैलीशी अखंडपणे मिसळतात, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0